अमर हिंद मंडळ, दादर आयोजित

कै. चिंतामणी नागले एकांकिका लेखन स्पर्धा निकाल २०२४

प्रथम पारितोषिक
एकांकिका – दी पॉड
लेखक :- ऋषिकेश सकपाळ

द्वितीय पारितोषिक
एकांकिका – त्यांचं आपलं सेम असत!
लेखक :- महेंद्र तेरेदेसाई

तृतीय पारितोषिक
एकांकिका – कळावे, लोभ असावा
लेखक :- रोहन गायतोंडे

उत्तेजनार्थ पारितोषिक
एकांकिका – लेबल
लेखक :- डॉ. निलेश माने

उत्तेजनार्थ पारितोषिक
एकांकिका – सेलिब्रेशन
लेखक :- साईनाथ सुरेश टांककर

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. दत्ता सावंत आणि श्री आनंद म्हसवेकर यांनी काम पाहिले.

पारितोषिक वितरण समारंभ दिनांक आणि वेळ लवकर कळवण्यात येईल.

अमर हिंद मंडळ थोडक्यात ....

स्वातंत्र्यपूर्व काळात देशभर स्वातंत्र्य चळवळींचे वारे जोरदारपणे वाहत होते. फाळणीनंतरच्या जातीय दंग्यांच्या काळात हिंदू-मुसलमानांचा परस्परांवरील विश्वास उडाला होता. अशा असुरक्षिततेच्या वातावरणात दादर विभागातील काही तरुणांनी एकत्र येऊन दादर नागरिक दलाची स्थापना केली आणि गस्त, पहारे सुरू केले. यातूनच हुतूतू प्रेमी राजा शेट्ये आणि नारायण पडते यांची व प्रकाशभाईंची ओळख झाली. गस्त आणि पहा-यांच्या निमित्ताने हुतूतूचे सामने भरवण्यापासून सुरू झालेल्या कार्यातून मग चर्चासत्रे व व्याख्यानमाला आयोजित करण्याची कल्पना पुढे आली. या अनुषंगाने बॉम्बे टाईपरायटींग इन्स्टिट्यूटमध्ये सर्व उत्साही कार्यकर्त्यांची सभा झाली. प्रकाशभाई मोहाडीकरांनी ‘अमर हिंद मंडळा’ची घटना, नियम यांचा आराखडा आपल्या सहका-यांसमोर मांडला. तो एकमताने मंजूर झाला आणि  २६ जानेवारी १९४७ रोजी ‘अमर हिंद मंडळा’ची स्थापना झाली. मंडळाचा पहिला उपक्रम म्हणून ‘वसंत व्याख्यानमाला’ आयोजित करण्याचे ठरविले. मंडळाची स्थापना झाल्यानंतर मंडळाला स्वतःची जागा मिळावी यासाठी इंजिनीयर नानासाहेब मोडक, काकासाहेब गाडगीळ, डॉ.राऊत आणि इतरांनी प्रयत्न केले आणि आज ज्या जागेत मंडळाची वास्तू उभी आहे ती जागा मंडळाला मिळाली.

सर्व अधिकार राखीव © २०२३ - अमर हिंद मंडळ

loading