कै. आबा पडते राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा २०२५
• सहभाग घेण्यासाठी अंतिम तारीख सोमवार दि.१० नोव्हेंबर २०२५
• प्राथमिक फेरीचे सादरीकरण सोमवार दि. १७ नोव्हेंबर ते बुधवार दि.१९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजल्यापासून तालीम स्वरुपात अमर हिंद मंडळ, अमरवाडी, गोखले मार्ग (उत्तर), पोर्तुगीज चर्च जवळ, दादर(प), मुंबई ४०००२८ येथे होईल.
• या स्पर्धेत भाग घेण्यासाठी शुल्क रु. १०००/- आहे.
• एका संस्थेकडून एकच प्रवेशिका दाखल करता येईल.
• प्रवेश अर्ज प्रत्येकाने ऑनलाइन स्वरूपात मंडळाच्या वेबसाइट वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून भरायचे आहेत.
• प्रवेश अर्ज लिंक – https://forms.gle/QjXw6dWpf4E1vFjYA
• स्पर्धेसंबंधी अधिक माहितीसाठी ८४१९९०१०८२/८३ या कार्यालयीन मोबाईल नंबरवर संपर्क करावा किंवा समीर चव्हाण – समन्वयक (९८२१८१२३३८) याच्याशी संपर्क करावा.
कै. श्रीकृष्ण राणे स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय मराठी एकांकिका लेखन स्पर्धा
अमर हिंद मंडळातर्फे नवोदित/ प्रस्थापित लेखकांसाठी कै. श्रीकृष्ण राणे स्मृतीप्रीत्यर्थ राज्यस्तरीय मराठी एकांकिका लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी कोणत्याही विषयावर एकांकिका लिहिल्या जाव्यात. परकीय कल्पना किंवा एखाद्या कथेवर आधारित असल्यास तसा उल्लेख करावा.
सामाजिक समस्यांवर आधारित लिहिल्यास, त्यावर निराकरणाचे उपाय सुचविणे अपेक्षित आहे. असे झाले तर समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य आपण काही अंशी का होईना बजावतोय, याचे समाधान आयोजकांना आणि लेखकांना मिळेल असे वाटते.
प्रवेश अर्ज आणि एकांकिकेच्या ३ साक्षांकित प्रती सादर करण्याची अंतिम तारीख – ७ नोव्हेंबर २०२५
प्रवेश शुल्क – रु.100/-फक्त
पारितोषिके
प्रथम क्रमांक – रु. 5000/- आणि प्रशस्तीपत्र
द्वितीय क्रमांक – रु.3000/- आणि प्रशस्तीपत्र
तृतीय क्रमांक ‐ रु.2000/- आणि प्रशस्तीपत्र
अधिक माहिती साठी संपर्क – अमर हिंद मंडळ, दादर संपर्क क्रमांक – ८४१९९०१०८२/८३
अधिक काही माहिती हवी असल्यास पुढील ईमेल वर संपर्क साधा. amarhindmandaldadar@gmail.com
आणि खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपली नोंदणी करा.
https://forms.gle/zd8msTn8UGQRMUPK6

राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा नाट्य परिषद करंडक २०२५
मंडळाच्या सर्व कलाकारांचे अभिनंदन
सर्वोत्कृष्ट एकांकिका
तृतीय क्रमांक – रु.५००००/- आणि प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह
एकांकिका – रेशनकार्ड
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन
तृतीय क्रमांक- रु. ३०००/- आणि प्रमाणपत्र सन्मानचिन्ह
प्रथमेश पवार
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
प्रथम क्रमांक –
रोख रक्कम रु. ७०००/- आणि प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
उत्तेजनार्थ अभिनय –
रोख रक्कम रु. २०००/- आणि प्रमाणपत्र
डॉ. मेघा गावडे
सर्वोत्कृष्ट नेपथ्य
तृतीय क्रमांक
रोख रु. ३०००/- प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह –
समीर चव्हाण
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना
द्वितीय क्रमांक
रोख रु. ५०००/- प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह
संजय तोडणकर
स्वातंत्र्यपूर्व काळात देशभर स्वातंत्र्य चळवळींचे वारे जोरदारपणे वाहत होते. फाळणीनंतरच्या जातीय दंग्यांच्या काळात हिंदू-मुसलमानांचा परस्परांवरील विश्वास उडाला होता. अशा असुरक्षिततेच्या वातावरणात दादर विभागातील काही तरुणांनी एकत्र येऊन दादर नागरिक दलाची स्थापना केली आणि गस्त, पहारे सुरू केले. यातूनच हुतूतू प्रेमी राजा शेट्ये आणि नारायण पडते यांची व प्रकाशभाईंची ओळख झाली. गस्त आणि पहा-यांच्या निमित्ताने हुतूतूचे सामने भरवण्यापासून सुरू झालेल्या कार्यातून मग चर्चासत्रे व व्याख्यानमाला आयोजित करण्याची कल्पना पुढे आली. या अनुषंगाने बॉम्बे टाईपरायटींग इन्स्टिट्यूटमध्ये सर्व उत्साही कार्यकर्त्यांची सभा झाली. प्रकाशभाई मोहाडीकरांनी ‘अमर हिंद मंडळा’ची घटना, नियम यांचा आराखडा आपल्या सहका-यांसमोर मांडला. तो एकमताने मंजूर झाला आणि २६ जानेवारी १९४७ रोजी ‘अमर हिंद मंडळा’ची स्थापना झाली. मंडळाचा पहिला उपक्रम म्हणून ‘वसंत व्याख्यानमाला’ आयोजित करण्याचे ठरविले. मंडळाची स्थापना झाल्यानंतर मंडळाला स्वतःची जागा मिळावी यासाठी इंजिनीयर नानासाहेब मोडक, काकासाहेब गाडगीळ, डॉ.राऊत आणि इतरांनी प्रयत्न केले आणि आज ज्या जागेत मंडळाची वास्तू उभी आहे ती जागा मंडळाला मिळाली.
सर्व अधिकार राखीव © २०२५ - अमर हिंद मंडळ